शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 25 जुलै 2014 (10:53 IST)

सुप्रिया सुळेंनी लाटली कोटींची जमीन- एकनाथ खडसे

राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार आणि सुप्रिया सुळे यांच्या संस्थेने बेकायदा कोट्यवधी रुपयांची जमीन लाटली असल्याचे धक्कादायक आरोप भाजपचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या ट्रस्टने पुणे, मुंबई व नाशिक शहरांमधील विविध सार्वजनिक भूखंड लाटण्यात आले आहेत. ऐंशी हजार कोटी रुपयांच्या या गैरव्यवहाराची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांनी ही मागणी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

चार वर्षांपासून आपण या जमीन गैरव्यवहाराबाबत विधानसभेत आवाज उठवला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, राज्यपालांना भेटलो व केंद्रीय दक्षता आयोगाकडेही दाद मागितली. माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या कागदपत्रांच्या स्वरुपात भक्कम पुरावे सादर करूनही राज्य सरकारने त्याची चौकशी केली नाही. दोन दिवसांपूर्वी यापैकी काही प्रकरणात पुण्यात पोलिसांकडे एफआयआर दाखल झाले असले तरी ते पुरेसे नाहीत. राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याने सीबीआय विशेष चौकशी पथक नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी अपेक्षा खडसेंनी व्यक्त केली आहे.