बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सोलापूर , शनिवार, 28 मे 2016 (15:34 IST)

सैराटने मराठ्यांची इज्जत काढली : नितेश राणे

'मराठ्यांची इज्जत काढणा-या, अपमान करणा-या सैराट चित्रपटाने कोट्यावधी रुपये कमावले मात्र तरीही त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही, मराठे शांत का?' असा प्रश्न विचारत काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी टीका केली.

मराठा आरक्षण प्रश्नावर सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते.  हा चित्रपट ८० कोटी कमावतो. मात्र अशाचप्रकारे चित्रपटात ब्राह्मण वा अन्य समाजाचे समाजाचे चित्रण केले असते, तर तो समाज शांत बसला असता का? त्यांनी संबंधितांना महाराष्ट्रात फिरू दिले असते का?' असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला.

यावेळी राणेंनी ठाकरे घराण्यालाही लक्ष्य केले. शिवसेनेचा वाघ गल्लीगल्लीतून संपल्याची टीकाही त्यांनी केली.