गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , मंगळवार, 30 जून 2015 (10:14 IST)

सोलापूरात शेतकर्‍यांवर लाठीचार

थकीत ऊसबिलासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडविणाºया शेतकºयांवर पोलीसांनी लाठीचार केला. पाटील यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

एफआरपीनुसार कारखान्यांनी शेतकर्‍यांना व्याजासह देणी अदा केली पाहिजेत, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी पाटील यांची गाडी अडविली. केंद्र सरकारकडून मदत मिळाल्याने बिले वाटपाची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

मात्र, गाडीपुढे घोषणा देत जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यार्नी ठिय्या दिला आणि प्रचंड संख्येत असलेले पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघषार्ची ठिणगी पडली. बंदोबस्तावरील पोलीसांनी लाठीमार सुरू केला.
दरम्यान, जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार होत असताना सहकारमंत्री केवळ बघत राहिले, असा आरोप करीत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केला असून पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.