शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2016 (15:57 IST)

हा एनडीएचा नव्हे तर भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार- राऊत

मुंबई- मोदी सरकारने आज 19 नव्या चेहर्‍यांसह केलेल्या मंत्रिमंडळात विस्तार हा एनडीए सरकारचा नव्हे तर भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. "मंत्रिमंडाळात संधी देण्यात आलेले सर्व चेहरे हे भाजपमधील आहेत. त्यांनी अकाली दलाला किंवा तेलुगु देशमला निमंत्रित केले नाही. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग नसल्याची आम्हाला काहीही चिंता नाही‘, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. 
 
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत नाराज असलेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच ‘आमचा पक्ष कॅबिनेट मंत्रीपदासाठी लाचार होऊन कोणाजवळ जाणार नाही‘ असे म्हटले होते.