शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (09:36 IST)

हार्दिकने बाळासाहेबांप्रमाणे वागावे : उद्धव

ठाणे- पटेल आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पटेलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानले असेल, तर त्याने त्यांच्याप्रमाणे वागावे, अशी भूमिका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 
 
गुजरातमध्ये पटेल समुदायाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली लाखो नागरिकांनी आंदोलन केले होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही माझे दैवत आहेत, असे सांगत हार्दिक पटेल याने सांगितले होते. गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक करीत आहे. या आंदोलनाला गुजरातमध्ये हिंसक वळण लागले होते. यामध्ये दहाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊन कोणीतरी घेतल्याचे पाहून मला आनंद होत आहे. पण, हार्दिक खरंच त्यांना रोल मॉडेल मानत असेल तर त्याने त्यांच्याप्रमाणे वागावे.