शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (10:34 IST)

हिंदू म्हणजे विविधतेत एकता- मोहन भागवत

'हिंदूत्व' म्हणजे 'विविधतेत एकता' असून या एकतेच्या माध्यमातून राष्ट्राचा विकास होऊ शकतो, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात भागवत बोलत होते.  
 
भारतात हिंदूंचे अस्तित्व सर्वात पूरातन असून हिंदूत्वातूनच नेहमी नवीन मार्ग निघत आला आहे आणि तसेच यापुढेही निघेल,याचा विश्वास असल्याचेही भागवत म्हणाले. एक हिंदू समाज म्हणून आपण एकत्र प्रयत्न करू असे आवाहन देखील भागवत यांनी यावेळी केले. संपूर्ण जगातील हिंदूंनी एकत्र येऊन आपल्या समाजाला बळकट करणे आणि राष्ट्राला पुढे घेऊन जाणे यासंबंधी विचार मांडण्याचे विश्व हिंदू काँग्रेस हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे मोहन भागवत यावेळी म्हणाले. तसेच भागवत यांनी हिंदूत्वाच्या प्रभाविकतेचे अनेक दाखले देखील आपल्या भाषणातून दिले.