शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नागपूर , बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (11:24 IST)

‍विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलिसाचा मृत्यु

विदर्भात ऐन मतदानाच्या दिवशी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाल्याने मतदारांची चांगलीच गोची झाली आहे. रामटेकमधील सावनेर मतदार संघातील एका मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यु झाला. तसेच 8 मतदार जखमी झाल्याचे समजते. 

‍आज (बुधवार) सकाळी सात वाजता विधानसभेसाठी मतदानास सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र मतदान सुरु असताना विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे विदर्भात मतदानाला सुरूवातीच्या टप्प्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे.