शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 30 एप्रिल 2015 (10:25 IST)

‘चक्का जाम’मुळे प्रवाशांना घाम

केंद्राच्या प्रस्तावित रस्ते सुरक्षा विधेयकाविरोधात 'नॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स' बंद पुकारल्याने रिक्षा, एस.टी सेवा आज बंद असून त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सुटी आणि लग्नाचा मुहूर्त असल्याने एस.टी स्थानकावर आलेले हजारो प्रवासी रखरखत्या उन्हात ताटकळले आहेत.
 
कामगार, सार्वजनिक वाहतूकक्षेत्र, टॅक्सी-रिक्षाचालकांनी पुकारलेल्या या बंदला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कामगारांनी बंद पाळल्याने सकाळपासूनच पुण्यासह राज्यातील एस.टी सेवा ठप्प झाली आहे तर रिक्षाचालकांनीही कडकडीत बंद पाळल्याचे दिसून येत आहे. काही संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला नसला तरी हजारो प्रवाशांच्या तुलनेने सुरु असलेली सेवा तोकडी पडत असल्याचे चित्र आहे. एस.टी बंदचा फायदा काही खासगी वाहतूक कंपन्यांनी केल्याचे दिसून येत असून खासगी गाड्यांच्या फेºया वाढविण्याबरोबरच भाडेवाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.