शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 ऑगस्ट 2016 (08:37 IST)

‘जीएसटी’वरून ठाकरे बंधूंची युती

मुंबई महापालिकेची स्वायत्तेची हमी मिळाली तर जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा  देऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर जीएसटीच्या आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. आज (सोमवारी) जीएसटीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांनी जीएसटी विरोधात केलेली विधाने महत्त्वाची मानली जात आहेत. 
 
काश्मीर आणि बलुचिस्तानविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतेली भूमिका योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 
 
शिवसेनेने सुरू केलेल्या आरोग्य वाहिन्यांच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी बोलत होते.  आरोग्यवाहिनी लोकार्पण सोहळ्याच्यावेळी अंधेरीत पाच आरोग्यवाहिन्या सुरू करण्यात आल्या. येत्या वर्षभरात 1 लाख 25 हजार रुग्णांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट यावेळी ठेवण्यात आले आहे.