गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , मंगळवार, 28 एप्रिल 2015 (11:34 IST)

‘डॅडीला’ हवाय ‘पॅरोल’

मुलाचे लग्न असल्याने डॅडी अर्थात कुख्यात अरुण गवळीला ३० दिवसांचा पॅरोल (अभिवचन रजा) हवा आहे. यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे. त्याचा मुलगा महेशचे ९ मे रोजी लग्न आहे.  लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर त्याने नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता. परंतु त्यांनी २३ एप्रिल रोजी अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाला गवळीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे़  दरम्यान, न्यायमूर्ती अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्यासमोर बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.