शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (10:54 IST)

‘तारीख पे तारीख’मुळे न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल

दरोड्याच्या गुन्ह्यातील सुनावणीस केवळ ‘तारीख पे तारीख’ पडत असल्याने वैतागलेल्या एका आरोपीने सुनावणीवेळी चक्क पायातील चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. कुलाबा येथील जिल्हा सत्र न्यायालयात ही घटना घडली.
 
चार वर्षेअटकेत असणार्‍या मदन चौहान या आरोपीने हे कृत्य करुन न्यायाधीशांना शिवीगाळही केली. पोलीसांनी त्यांन या गुन्ह्याबद्दलही अटक केली आहे. एका दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये  पोलिसांनी २०१२ मध्ये चौहानला अटक केली होती. त्याच्या खटल्यासाठी त्याला सुनावणीसाठी बोलाविले जात होते. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कुलाबा येथील सत्र न्यायालयाचे न्या. एस.व्ही पाटील यांच्यासमोर त्याला उभे करण्यात आले.
 
पुन्हा पुढची तारीख मिळाल्याने चौहानला राग आला आणि त्याने आपली चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. त्याने न्यायाधीशांना शिवीगाळही केली.