शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (14:28 IST)

‘पुणं तिथ प्रामाणिकपणाच उणा’

संस्कृतीरक्षक, विद्येचं माहेरघर, आटी सिटी, मेट्रो सिटी या आणि अशा अनेक बिरुदावली मिरवणाºया पुण्यात प्रामाणिकपणा कमी झाला असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुण्याचा पहिला नंबर लागला असल्याचे एका दैनिकाने दिलेल्या वृत्तातून स्पष्ट झाले आहे.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्टातील भ्रष्ट शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. याचा दाखला देत एका वृत्तपत्राने वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तानुसार या यादीत पुण्यानं सर्वात पहिला क्रमांक पटकावला आहे. चालू वर्षात पुण्यात लाच घेतल्याप्रकरणी २१६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्या खालोखाल नाशिकचा क्रमांक असून इथं लाचखोरीच्या प्रकरणात २१० जणांना अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे.