शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 29 जुलै 2016 (14:37 IST)

‘मातोश्री’वर राज -उद्धव भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज आहे.

राज आणि उद्धव या दोघांमध्येच सुमारे दीड तास चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची कामं होत नसतील, तर सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा भाजपला दिला होता. त्यातच विधीमंडळात मुंबईतील खड्ड्यांवरुन शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. त्यामुळे राज – उद्धव यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा संपत्ती वाद आणि उद्धव ठाकरे- जयदेव ठाकरे यांच्यातील न्यायालयाीन लढाई या पार्श्वभूमीवरही ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.