शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. शीख
  4. »
  5. तीर्थ-क्षेत्र
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

सुवर्णमंदिर

पंजाबमधील अमृतसर येथील हरीमंदिर साहिब (दरबार साहिब) म्हणजेच सुवर्णमंदिर हे शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे. हे मंदिर स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते. मंदिर पहायला जगभरातून लोक येतात. मोगल बादशाह अकबर याने 1574 मध्ये शीखांचे तिसरे गुरू अमर दास यांना भेटायला आला होता.

येथील घनदाट जंगल, तलाव तसेच येथील लोकांची जगण्याची पद्धत पाहून तो प्रभावित झाला होता. शीखांचे पुढचे गुरू, गुरू रामदास यांनी येथे तलाव वाढवला व लहानसे शहर वसवले. पाचवे गुरू अर्जुनदेव यांनी येथे देऊळ बांधायला घेतले.

डिसेंबर 1588 मध्ये येथे लाहोरचे सुफी हजरत मिन मीर यांच्या हस्ते बांधकामास सुरवात झाली. 1601 मध्ये काम पूर्ण झाले. मात्र काही काळानंतर अफगाणच्या अहमदशहा अब्दालीने केलेल्या आक्रमणात मंदिराचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे पुन्हा 1760 मध्ये मंदिर बांधण्यात आले. या मंदिराच्या चहूबाजूंनी पाणी आहे. त्याला सर्वजण अमृत म्हणतात. मंदिराला चार बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. या मंदिरात कोणीही प्रवेश करू शकते.

फक्त प्रवेश करते वेळी त्याने आपल्या डोक्यावर रूमाल बांधावा. सुवर्णमंदिरावरील कोरीव काम हे एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीला झाले. पंजाबचे महाराज रणजीत सिंह यांनी या मंदिरावर सोन्याचा मुलामा चढविला.