गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. प्रजासत्ताक दिन
Written By वेबदुनिया|

राजपथावर भारतीय संस्कृतीचे दर्शन!

'प्रजासत्ताक दिन' भारतीयांचा आनंदोत्सव. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश हा उत्सव मोठ्यहर्षोल्हासाने साजरा करीत असतो. अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या ह्या उत्सवासाठी 'दिल्ली में धम्माल' सुरू झाली आहे. इंडिया गेटवर होणार्‍या पथसंचलनासाठी ‍भारतातील अनेक राज्याचे प्रतिनिधी सहभागी होत असून विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन ते घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. सैन्य दलाचे जाबाज जवान, विद्यार्थ्यांचा आपल्या देशाचे प्रतिक असलेल्या तिरंग्याला मानवंदना देण्‍यासाठी सराव सुरू झाला आहे.

भारताच्या प्रजासत्ताकदिनाचे मुख्य आक्रर्षण म्हणजे दिल्लीतील इंडिया गेटवर होणारे पथसंचलन होय. छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान यांच्यासह अनेक राज्ये या संचलनात सहभागी होत असून त्यांनतयार केलेल्या देखाव्यातून तआपल्या राज्यातील संस्कृतीची ओळख करून देत असता‍त.

ND
ND

मुंबईतील डबेबाले राजपथावर:
प्रजासत्ताकदिनी मुबंईचे डबेवाल्यांचे संचलन राजधानीतील राजपथावर होणार आहे. मुंबईतील चाकरमान्यांपर्यंत वेळेवर त्यांचा डबा कसा पोहचवला जातो आणि त्यासाठी काय कसरत करावी लागते, याचे प्रात्यक्षिक या निमित्ताने दिल्लीकरांना दाखविणार आहेत.

प्रजासत्ताकदिनी राजपथावर आपल्या संस्कृतीची ओळख म्हणून महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 14 डबेवाल्यांनी भाग घेतला आहे. या डबा संस्कृतीची दिनचर्या कशी असते या विषयीची माहिती राजपथावर हे डबेवाले सादर करणार आहेत.

मुंबईचा डबा हा मुंबईच्या संस्कृतीचा एक भाग आहे. ऑफिसपर्यत डबा अचूकपणे पोहोचवणे ही या डबेवाल्यांची खासीयत मुंबईकरांच्या अंगवळणी पडली आहे. त्यातली अचूकता लोकांसमोर येण्यासाठी त्याचे प्रदर्शन संचलनानिमित्ताने दिल्लीकरांना घडेल. चित्ररथात सीएसटी रेल्वे स्टेशनही दाखविले आहे. यामध्ये 12 पुरूष व 2 महिलांनी भाग घेतला आहे.

छत्तीसगडची कोटमसर गुहा:
WD
WD

छत्तीसगड राज्याच्या चित्ररथावर 'कोटमसर गुहा' दिसणार आहे. 'कोटमसर गुहा' ही छत्तीसगडमधील कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानात स्थित आहे. ही गुहा आपले ऐतिहासिक अवशेष व विलोभनीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. याचा शोध 1951 मध्ये डॉ. शंकर तिवारी यांनी लावला होता.

'कोटमसर' या शब्दाचा अर्थ 'पाण्‍याने वेढलेला किल्ला' असा आहे. भूगर्भ वैज्ञानिकांना या गुहेत प्राचीन काळीतील मानवाचे अवशेष ही सापडले होते. कोटमसर ही गुहा सुमारे 250 कोटी वर्ष जुनी आहे. छत्तीसगड येथील कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानातील ही गुहा पाहण्‍यासाठी प्रत‍िवर्षी 60 हजार पेक्षा अधिक लोक येत असतात.

जयपूरचा गुलाबी रंग राजस्थानला:
WD
WD

राजस्थान राज्याचे प्रतिनिधी संचलनातून चित्ररथावरून जयपूरच्या रंगाची‍ उधळण करणार आहेत. जयपूर शहराचे निर्माता महाराजा सवाई जयसिंह यांची ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी ज्योतिष शास्त्रातील ग्रंथ 'सूर्य सिद्धांत' याचे अध्ययन केले होते. या अभ्यासातून त्यांनी आकाशातील विविध ग्रहाचा त्या काळी शोध लावला होता. तसेच त्यांनी 1718 मध्ये वेधशाला निर्मितीचा विचार सर्वप्रथम मांडला होता.

त्यानंतर त्यांनी सलग सहा वर्ष अखंड परिश्रम घेऊन दिल्ली येथे स्थित तत्कालीन जयसिंहपुरा नामक ठिकाणावर सन 1724 मध्ये प्रथम पाषाण वेधशाळेची निर्मिती केले होती. जयपूर येथील वेधशाळेच्या कामाला महाराजा सवाई जयसिंह यांनी 1728 मध्ये प्रारंभ केला होता. जयपूर वेधशाळेत यंत्राची संख्या अधिक असल्याने 'राशी वलय' नामक यंत्र तेथे असल्याने महत्त्वपूर्ण मानली जाते.

राजस्थानच्या च‍ित्ररथावर मध्यभागी नाडी यंत्रासोबत जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह यांची प्रतिमा आहे. पार्श्व भागात राम यंत्र, वृध्द व लघु सम्राट यंत्र, जय प्रकाश यंत्र तसेच जयपूर येथील स्थापत्य कलेचे नमुने प्रदर्शित करण्यात आले आहे. याशिवाय ज्योतिषि व पर्यटकांचे थ्रीडी मॉडेल ही आकर्षक रूपात ठेवण्यात आले आहे. नाडी यंत्र व त्यासोबत चार कळस धरलेल्या महिला व पाच ज्योतिषांचा चमु 'जंतर-मंतर' संदर्भात श्लोकांचा मंत्रोच्चार करत पायी चालताना दिसणार आहे.

अशा पध्दतीने वेगवेगळ्या राज्यातील प्रतिनिधी आपल्या राज्यातील संस्कृतीची ओळख चित्ररथावरून राजपथावर 26 जानेवारी रोजी दिल्लीकरांना करून देणार आहे.