शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By वेबदुनिया|

विजयी विश्व तिरंगा प्यारा....

आमचा हा अत्यंत प्रिय असलेला तिरंगा झेंडा, सार्‍या विश्वात विजयी होवो, तो सदैव उंच फडकत राहो. आम्हाला शक्ती देणारा, आमच्यावर प्रेममयी अमृताचा वर्षाव करणारा. भारतीय वीरांना प्रफुल्लीत करणारा हा तिरंगी झेंडा आमच्या मातृभूमीचे सर्वस्व आहे. तो सदैव उंच फडकत राहो. आम्ही प्रसंगी आमचे प्राणही देऊ, पण या झेंड्याची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ देणार नाही, तो सदैव उंच फडकत राहो.... सन 1931मध्ये राष्ट्रीय सभेने चरखांकित तिरंगी ध्वज राष्ट्रध्वज म्हणून मान्य केला.

राष्ट्रध्वजाचे केशरी, पांढरा व हिरवा हे तीन रंग धर्माचे निदर्शक नसून ते गुणांचे निदर्शक आहेत, असेही स्पष्ट केले. केशरी रंग हा धैर्य, त्याग, शौर्य आणि समर्पण, पांढरा रंग सत्य, शांतता, पावित्र्य, साधेपणा व ज्ञान तर हिरवा रंग समृद्धी, कृतज्ञता, प्रसन्नता आणि श्रद्धा या गुणांचे प्रतीक आहेत. अशोकचक्र हे सद्‍गुणांची, प्रगतीती व धर्माची खूण आहे. या ध्वजा खाली कार्य करताना आपण धर्ममय, सत्यमय राहू असा याचा अर्थ आहे. चक्र म्हणजे गती, हे चक्र सांगते की गतिमान राहा. या ध्वजाखाली सर्वांना आधार मिळेल. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारी वृत्तीने ‍आणि आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करूया.