testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

इंडियन मुजाहिदीन संघटना प्रकाशात

Indian mujahidiin
WDWD
जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी 'इंडियन मुजाहिदीन' ही दहशतवादी संघटना 'आयएसआय'च्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास प्रवृत्‍त केले जाते. 2008 मध्ये या संघटनेने देशातील विविध भागात केलेल्या स्फोटांनंतर ही संघटना प्रकाशात आली. यापूर्वी सिमी या नावाने काम करणार्‍या संघटनेने पोलिसांपासून आपली ओळख लपवण्यासाठी नविन नाव धारण करत देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या संघटनेची ही माहिती

इंडियन मुजाहिदीन कोण?- भारतात धर्मिक विद्वेश पसरवून देशाच्‍या एकतेला आणि अखंडतेला धोका पोचविण्‍याच्‍या उद्देशाने 'सिमी'ची
(स्‍टुडंट्स इस्‍लामिक मुव्‍हमेंट ऑफ इंडिया) स्‍थापना करण्‍यात आली आहे. या दहशतवादी कारवाया करणा-या संघटनेवर बंदी आणण्‍याचा निर्णय केंद्राने घेतल्‍यानंतर देशभर या संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांना अटक करण्‍यात आली. त्‍यामुळे भारतात सिमीच्‍या कारवायांवर बंधने आली. यातून पळवाट करण्‍यासाठी सिमीने आपल्‍या नावात बदल करून 'इंडियन मुजाहिदीन' हे नाव धारण केले आहे. याशिवाय सिमीचे आणखीही अनेक संघटनांशी संबंध आहेत.

आर्थिक मदत कुठून?- भारतात दहशतवादी कारवाया पसरविण्‍यासाठी भारतातीलच काही मुस्लिम तरुणांना भडकावून 'जिहाद'च्‍या नावाखाली त्‍यांच्‍याकडून देशविघातक कृत्‍य करवून घेत असल्‍याचा या संघटनेवर आरोप आहे. या संघटनेला दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्‍तानच्‍या 'आयएसआय' या गुप्‍तचर संस्‍थेकडून आर्थिक मदत केली जात असल्‍याचे अनेक पुरावे केंद्र सरकारकडे आहेत.

'मुजाहिदीन' म्‍हणजे काय?- मूळचा ऊर्दु शब्‍द असलेल्‍या मुजाहिदीनचा अर्थ 'लढवय्या' असा होतो. एका ठराविक उदेशाने धार्मिक युध्‍द छेडण्‍याची परवानगी इस्‍लाममध्‍ये देण्‍यात आली आहे. त्‍यास 'जिहाद' असे म्‍हटले जाते. त्‍याचा आधार घेऊन दहशतवादी कारवायांसाठी 'जिहाद'च्‍या नावाखाली मुस्लिम तरुणांची दिशाभूल करण्‍याचे काम ही संघटना करते आहे. या जिहादमध्‍ये सहभागी होणा-यांना मुजाहिदीन असे म्‍हटले जाते. एकदा जिहाद पुकारल्‍यानंतर तो संपविण्‍याचा अधिकार कोणालाही नसतो. त्‍याचे स्‍वरूप किंवा उद्देश मात्र बदलता येते. जिहादला विरोध करणारे सर्व जण जिहादच्‍या मान्‍यतेनुसार शत्रू समजले जाते.

आजवर संघटनेने केलेल्‍या कारवाया- सिमी आणि लष्‍कर-ए-तोयबा या संघटनांशी संबंधित असल्‍याने इंडियन मुजाहिदीन या संघटनेवर भारतात बंदी असून या संघटनेच्‍या सभासदत्‍वास बंदी करण्‍यात आली आहे. इंडियन मुजाहिदीन किंवा मिलिटंट इस्‍लामिक गृप ऑफ इंडिया या सिमीशी संबंधित संघटनांनी भारतात आजवर अनेक दहशतवादी कारवाया पूर्ण केल्‍या आहेत.

23 नोव्‍हेंबर 2007 या दिवशी उत्‍तर प्रदेशात, 13 मे 2008 जयपूरमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट करण्‍यासोबतच 2008 या एकाच वर्षात या संघटनेने बंगरूळ, अहमदाबाद आणि 13 सप्‍टेंबर रोजी दिल्‍लीतील पाच भागांत बॉम्‍बस्‍फोट घडवून आणले आहेत. याशिवाय सूरतसह अनेक ठिकाणी बॉम्‍ब पेरल्‍याचाही या संघटनेवर आरोप आहे.

दहशतवादी कारवाई पूर्ण केल्‍यानंतर भारतातील प्रसिध्‍दी माध्‍यमांना ई-मेलने माहिती देऊन हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारण्‍याची या संघटनेची पध्‍दत आहे. जयपूरमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट केल्‍यानंतर दोनच दिवसांनी या संघटनेने ई-मेलव्‍दारे देशात आणखी धमाके करण्‍याची धमकी दिली होती. अहमदाबादमध्‍ये केलेल्‍या स्‍फोटात सर्वाधिक 56 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या स्‍फोटानंतर आणि दिल्‍लीत झालेल्‍या स्‍फोटानंतर पाठविण्‍यात आलेले ई-मेल हे मुंबईतूनच पाठविण्‍यात आले होते. दिल्‍ली स्‍फोटांनंतर केलेल्‍या ई-मेलमध्‍ये संघटनेने दिल्‍लीनंतर आता आपण मुंबईवर हल्‍ला करणार असल्‍याची स्‍पष्‍ट धमकी दिली आहे.

वेबदुनिया|
या संघटनेने आजवर केलेले सर्व हल्‍ले गर्दीच्‍या ठिकाणी झालेले आहेत. तर सायकलींमध्‍ये, कच-याच्‍या ढिगा-यात प्‍लास्‍टीकच्‍या पिशव्‍यांमध्‍ये बॉम्‍ब ठेवले होते.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

नवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी

national news
उपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...

सुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा

national news
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...

रोज कस्टर्ड

national news
सर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...

फास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक

national news
सिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...

फळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...

national news
फळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...