testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

परखड नाटककार विजय तेंडूलकर

वेबदुनिया|
यावर्षीचा मागोवा घेताना त्यांचे निधन ही भारतीय रंगमंचावर मोठा आघात करणारी घटना ठरली. त्यांच्या निधनाने कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली हे खरे.





मराठी नाट्यसृष्टी समृद्ध करणारे नाटकककार म्हणून विजय तेंडूलकरांचे योगदान फार मोठे आणि महत्त्वाचे आहे. आशयघन, सकस आणि काही विचार मनात पेरणारी त्यांची नाटके आहेत. त्यांची घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे ही नाटके पाहून कोरड्या मनांनी प्रेक्षक बाहेर पडूच शकत नाही. त्याला अस्वस्थ करण्याशिवाय रहात नाही. हेच तेंडूलकरांच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तेंडूलकरांशिवाय मराठीच नव्हे भारतीय नाटकांचा इतिहासच पूर्ण होऊ शकणार नाही.

तेंडूलकरांनी वयाच्या सहाव्या वर्षी पहिली कथा लिहिली. त्यानंतर अकराव्या वर्षी पहिले नाटक लिहून अभिनयासह दिग्दर्शनाची भूमिकाही पार पाडली होती. १९२८ मध्ये जन्मलेल्या तेंडूलकरांचा नाटककार हा प्रवास प्रिंटीग प्रेसचा व्यवसाय, पत्रकारिता, जनसंपर्क अधिकारी असा झाला. आतापर्यंत त्यांनी २८ नाटके, सात एकांकिका, सहा बालनाट्य, चार कथासंग्रह, दोन कादंबर्‍या एवढी साहित्यसंपदा निर्णाण केली आहे. त्यांच्या घाशीराम कोतवाल या नाट्यकृतीने खूपच खळबळ माजवली.

पेशव्यांच्या काळात कोतवाल असणार्‍या घाशीरामने त्यावेळी खूप अत्याचार केले होते. बावनखणीत जाणार्‍या कोतवालाचे आयुष्य अगदी रगेल आणि रंगेल होते. तेच तेंडूलकरांनी या नाटकात मांडले होते. सांगितिक सादरीकरणाने नाटकही छान जमले होते. सुरवातीच्या वादानंतर मात्र हे नाटक धोधो म्हणजे सहा हजार प्रयोगांइतके चालले. आजही एखादा ग्रूप ते सादर करतो तेव्हा पहाण्यासाठी नक्कीच गर्दी होते. तेंडूलकरांचे आणखी गाजलेले व खळबळजनक नाटक म्हणजे सखाराम बाईंडर.

स्त्रियांना कचरा मानून त्यांचा येथेच्छ उपभोग घेणार्‍या सखारामच्या माध्यमातून तेंडूलकरांनी पुरूषी मानसिकेतेचेही विश्लेषण केले. या नाटकाला कुठेही काळाच्या मर्यादेत बांधता येणार नाही. कारण अशा प्रकारची मानसिकता ही कुठल्याही काळात असू शकते. पण एकूणच हे नाटक आल्यानंतर खूपच वादळ उठले. शिवसेनेने नाटकाविरोधात आंदोलन केले. सरकारनेही त्यावर बंदी घातली होती. नंतर ती उठवलीही. पण नाटकापुढची गर्दी ओसरली नाही. आता मराठीतील एक माईलस्टोन नाटक म्हणून ते ओळखले जाते.


गुजरातमध्ये मुस्लिमांच्या हत्येसाठी तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार असल्याने 'माझ्या हातात बंदूक असती तर मी नरेंद्र मोदींना मारले असते,' असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

अनेक भाषांमध्ये हे नाटक गेले आहे. त्याची शांतता कोर्ट चालू आहे, गिधाडे, कमला, कन्यादान ही अन्य काही नाटके. तेंडूलकरांनी लिहिलेल्या अनेक नाट्यकृती भारतीय नाट्य परंपरेतील ठेवा ठरल्या आहेत. तेंडूलकरांनी चित्रपटक्षेत्रातही ठसा उमटवला आहे. सामना, सिंहासन आक्रित, उंबरठा, निशांत, अर्धसत्य (हिंदी) या चित्रपटांच्या पटकथा तेंडूलकरांच्याच. हे सर्व चित्रपट गाजले. गिरीश कर्नाड, बादल सरकार आणि या सर्वकालीन महान नाटककारानी आधुनिक भारतीय नाट्यपरंपरेचा पाया रचला आहे.

तेंडूलकरांच्या नाटकांचे महोत्सव महाराष्ट्राबाहेर तर झालेच पण गेल्यावर्षी अमेरिकेतही झाला. विशेष म्हणजे तेथे सादर झालेल्या बाइंडरमध्ये इंग्रजी कलावंतांच्या भूमिका होत्या. तेथील नामांकित वृत्तपत्रात त्याची कौतुक करणारी परीक्षणे छापून आली.





तेंडूलकरांचे मोठेपण सांगायवयास एवढे पुरेसे. अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे. तेंडूलकर गेल्या काही दिवसांतील बदलत्या राजकीय स्थितीनेही अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता ते शब्दातून परखडपणे व्यक्त करतात. गुजरातमध्ये मुस्लिमांच्या हत्येसाठी तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार असल्याने 'माझ्या हातात बंदूक असती तर मी नरेंद्र मोदींना मारले असते,' असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. एरवी कायम अशा परिस्थितीविरोधात विरोधात शब्दांची शस्त्रे चालविणार्‍या तेंडूलकरांवर हाती शस्त्र उचलण्याची वेळ का आली यावर वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने त्यानंतर भरले होते.

तेंडूलकरांची मुलगी साहित्यिक व अभिनेत्री प्रिया तेंडूलकरचे कर्करोगाने निधन झाल्याने तेंडूलकर खचले होते. यातून ते पूर्णपणे सावरलेच नाही.

विजय तेंडूलकरांचे लेखन
नाटक : शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाईंडर, कमला, कन्यादान, गिधाडे, मित्राची गोष्ट, द सायकलिस्ट, माझी बहिण, झाला अनंता हनुमंता, श्रीमंत, मी जिंकलो मी हरलो

चित्रपट पटकथा : निशांत, सामना, मंथन, सिंहासन, गहराई, अंकीत, आक्रोश, उंबरठा, अर्धसत्य.


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

मधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी

national news
पिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...

पाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा

national news
बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...

यू नेव्हर नो...

national news
हातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...

रेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...

national news
South Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...

कंबाला आणि थोडा

national news
कर्नाटकमधल्या गावांमध्ये बफेलो रेसचं आयोजन केलं जातं. या शर्यतीला 'कंबाला' म्हणतात. ...