testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राजकारणात चर्चा झाली ती नारायण राणे यांची

narayan rane
Last Modified शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (11:51 IST)
यावर्षी राज्यातील राजकारण पुन्हा एकदा फिरले ते नारायण राणे यांच्या भोवती. शिवसेना सोडून कॉंग्रेस मध्ये प्रवेश केलेले आणि कॉंग्रेस सोडून स्वतःचा पक्ष काढला आहे. मात्र त्यांच्या या कृतीने कॉंग्रेस आणि शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे.
नारायण राणे हे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र त्यांनी आता स्वतःचा पक्ष काढला आणि भाजपला पाठींबा दिला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'ची घोषणा केली. त्यांचा लवकरच राज्य मंत्री मंडळात प्रवेश होणार असून त्याला मात्र शिवसेनेन मोठा विरोध दर्शवला आहे. मात्र तरीही राणे मंत्री होतील असे भाजपातील अनेक नेते सांगत आहेत. विधान परिषदेवर निवडून आणत मंत्रीपद द्यायचे हे भाजपचे ठरले खरे पण शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचे मंत्री होण्याचे तर सोडाच पण विधानपरिषदेवर जायचे ही तूर्तास थांबले आहे, विधान परिषद निवडणुकीमध्ये पत्ता कापला गेल्यानंतर नारायण राणे यांनी प्रथमच याबाबत जाहीर संताप व्यक्त केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे अयत्या बीळावर नागोबा आहेत, अशा शब्दांत राणेंनी आपला राग व्यक्त केला होता. आता भविष्यात नेमके काय होते हे पाहणे गरजेचे होणार आहे.


यावर अधिक वाचा :