गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

सचिनच्या कारकिर्दीतील रंजक गोष्टी

WD
सुरुवातीला वेगवान गोलंदाज बनण्याची ‍सचिनची इच्छा होती, परंतु 1987मध्ये चेन्नईत एमआरएफ पेस फाऊंडेशनचे मार्गदर्शक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांची त्याला नाकारले.

भारतीय उपखंडात पार पडलेल्या 1987च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान सचिन मैदानावर बॉलबॉंय म्हणून वावरत होता.

सचिनने त्याचा बलणीचा मित्र आणि भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीसोबत आंतरशालेय स्पर्धेत 1988ला 664 धावांची भागीदारी करताना 326 धावा ठोकल्या होत्या.

1992मध्ये इंग्लिश काऊंटीमध्ये सचिन वयाच्या 19व्या वर्षी खेळला. या स्पर्धेत खेळणारा भारताचा सर्वात तरुण आणि याच स्पर्धेत वॉर्कशायर संघाकडून खेळणारा पहिला विदेशी खेळाडूही ठरला.

सचिनने भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषक या मुख्य तिन्ही स्पर्धांत पदार्पणातच शतके ठोकली.

सचिनचा आवडता खेळाडू हा कोणी क्रिकेटपटू नव्हे, तर टेनिसपटू जॉन मॅग्ररो होता.

कराची येथे पदार्पणाच्या सामन्यात तो भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी भेट दिलेले पॅड बांधूनच मैदानात उतरला होता.

सचिनने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास 1.5 किलो वजनाची अवजड बॅटच वापरली.

सचिनने वयाची 20 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच कसोटीत पाच शतके ठोकली.

सचिनने 1998मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ शतकांसह 1894 धावा ठोकल्या.

सचिनची 2012 मध्ये राज्यसभेवर निवड करण्यात आली.