शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिन आता विंग कमांडर

PTI
PTI
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याच्या उपाधीमध्ये आता आणखी एकाने भर पडणार आहे. सचिनला भारतीय हवाईदलाकडून विंग कमांडर उपाधी दिली जाणार असून त्यासंदर्भातील फाईल संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. या गौरवामुळे सचिन विंग कमांडर सचिन तेंडुलकर होणार आहे. यापूर्वी पायदळाने कपिलदेवला लेफ्टनंट कर्नल ही पदवी दिली होती. परंतु हवाईदलाकडून मानद उपाधी मिळणारा सचिन हा पहिला क्रिकेटर ठरणार आहे.

हवाईदलातील अधिकार्‍यांनी युनीवार्ताला यासंदर्भात माहिती दिली. सचिनला विंग कमांडर रॅंक देण्यासंदर्भातील औपचारिकता पूर्ण झाली असून फाईल मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले.

सचिनला गेल्या काही महिन्यांपासून हवाईदलाची मानद रॅंक देऊन गौरविण्याचा विचार सुरु होतो. परंतु त्याला विंग कमांडर पदवी द्यावी की स्क्वार्डन लिडर यावर चर्चा सुरु होती. सचिनचे वय आणि त्याची क्रिकेट कारकीर्द पाहता त्याला विंग कमांडर पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हवाई दलाने यापूर्वी अनेक नामवंत व्यक्तींना मानद पदवी दिली आहे. त्यात जामनगरचे नवाब जाम साहब, उद्योगपती विजय सिंघानिया यांचा समावेश आहे.