गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

विक्रमादित्य सचिन

NDND
आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सचिनच्‍या नावे अनेक विक्रम आहेत. त्‍यापैकी एकदिवसीय क्रिकेटमधील त्‍याची कारकिर्द अशी-

1. सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणारा सचिन हा सनत जयसुर्या नंतरचा एकमेव खेळाडू आहे. हा विक्रम दोघांच्‍या नावावर आहे.
2. सचिन सर्वाधिक (50) वेळा सामनावीर ठरला आहे.
3. सर्वाधिक (89 वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम त्‍याने केला आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील एकही मैदान सचिनच्‍या खेळापासून वंचित राहिले नसावे.
4. कसोटी आणि एकदिवसीय ससामन्‍यातही सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करण्‍याचा मान त्‍याच्‍याच नावे आहे.
5. एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 हजारांपेक्षा जास्‍त धावा करणारा एकमेव फलंदाज.
6. गोलंदाज म्‍हणून सचिनने 100 हून अधिक बळी घेतले आहेत.
7. तर 10 हजारांपेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये त्‍याची सरासरी सर्वाधिक आहे.
8. एकाच वर्षात एक हजार किंवा त्‍यापेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रमही सचिनने आतापर्यंत सहा वेळा केला आहे. तर 1998 मध्‍ये त्याने 1894 एकदिवसीय धावा केल्या आहेत.