शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिनची फलंदाजी जुन्या मद्याप्रमाणे

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची फलंदाजी म्हणजे एखाद्या जुन्या मद्याप्रमाणे आहे. मद्य जितके जुने तितकी त्याची नशा चढते त्याचप्रमाणे सचिनच्या फलंदाजीची नशाही दिवसंदिवस वाढत आहे, असे कौतुक पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने केले.

सचिनच्या धमाकेदार 138 धावांमुळे भारताने कॉम्पक कपमध्ये श्रीलंकेचा 46 धावांनी पराभव करुन विजेतेपद पटकविले. त्याबद्दल बोलताना अक्रम म्हणाला की, वयाबरोबर सचिनची फलंदाजी उत्तरोत्तर परीपक्व होत आहे. काळानुसार तो महान होत जात आहे. कारकिर्दीच्या शेवटी फलंदाजीतील सर्वच विक्रम सचिनच्या नावावर असतील. आद्रता असताना शतकी खेळ केल्यामुळे सचिन पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध होते. युवा खेळाडूंना शिकण्यासाठी सचिन हा चांगला आदर्श आहे, असे अक्रमने सांगितले.