शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिनने कश्या केल्यात 200 धावा

PTI
PTI
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 40 वर्षे आणि 2942 सामन्यांनंतर पहिले द्विशतक विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने केले. वयाच्या 36 व्या वर्षी 20 वर्षाच्या युवकाला लाजवेल असा जोश सचिन कसा निर्माण करु शकला. सचिनची लगन, मेहनत आणि परिश्रमामुळे हे शक्य झाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याने चार मंत्रांचा वापर करुन 'मिशन इम्पॉसिबल'ला 'मिशन पॉसिबल'मध्ये रुपातंरीत केले.

पहिला मंत्र: नियमित चार तास सरा
सचिन तेंडुलकरने या कामगिरीसाठी असाधारण अशी मेहनत केली आहे. रोज नेटवर जावून चार तास सराव तो करीत होतो. विशेषत: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इंडोर अकादमीमध्ये कसून मेहनत केली. कमीत कमी नियमित चार तास तो सराव करीत होतो.

दुसरा मंत्र: ओल्या चेंडूने सरा
दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज स्टेन आणि मार्केल वेगाने बॉउन्सर टाकतात, हे लक्षात घेऊन सचिनने रणनीती तयार केली. कसोटी मालिकेनंतर त्याने त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यासाठी त्याने रबरच्या ओल्या चेंडूने सराव केला. कारण रबरचा चेंडू अचानक उसळी घेत असतो. तसेच ओल्या चेंडूमुळे ती स्वींग चांगली होती.

तिसरा मंत्र: उन्हात सरा
सचिन नेट प्रॅक्टीस करताना इंडोर स्टेडियममधील वातानूकुलीत यंत्रणा बंद ठेवतो, हे सर्वांना माहीत आहे. साधारण वातावरणात सराव करुन तो आपला घाम गाळतो. उन्हात सराव करुन प्रत्यक्ष मैदानावर सरावाची तो तालीम करतो. मैदानावरील सर्व समास्या सरावातही समोर याव्यात, हा त्याचा प्रयत्न असतो.

चौथा मंत्र: बॉडीलाईन गोलंदाजीचा सरा
सचिनने बॉडीलाईन गोलंदाजीवरही सराव केला. शॉट पिच चेंडूवर खेळता यावे यासाठी त्याने हा सराव केला. सरावादरम्यान त्याच्या शरीरावर अनेक वेळा रबराचा चेंडू लागला. आपले फुटवर्क अधिक चांगले तयार करण्यासाठी त्याला त्याचा उपयोग झाला.