गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. शिवजयंती
Written By वेबदुनिया|

शिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले!

PR
छत्रपती शिवाजी महराजांचे एक दुर्मीळ पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडले आहे. हे पत्र अस्सल असून, यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. शिवाजी महाराजांचे हे पत्र 1929मध्य मंडळातल्या स.गं. जोशी यांना मिळाले होते. त्यानंतर मंळडाने या पत्रातला मजकूर 1930 मध्ये शिवचरित्र-साहित्य खंड 2मध्ये प्रकाशित केला. त्यांनतर मात्र 1930मध्ये हे पत्र गहाळ झाले होते. आता तब्बल 82 वर्षांनंतर हे पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र अत्यंत जीर्ण झाले असून, त्यातील पंचाहत्तर टक्के मजकूर हा सध्याच्या परिस्थितीतही वाचता येतो. शाई जास्त लागल्यामुळे शिक्कामोर्तबाचे वाचन करता येत नाही, मात्र मोजमापावरून हे पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अर्थात 1646 मध्ये लिहिलेले होते.