testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्राद्ध कसे करावे (पितृपंधरवडा विशेष)

shradha paksha
WD
फळ का मिळत नाही:-
श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीस न दिल्यास, पारंपरिक पद्धत न पाळल्यास, योग्य दक्षिणा न दिल्यास फळ मिळत नाही. जे श्राद्ध श्रद्धेने केले नाही, त्यावर दुष्ट प्राण्याची नजर पडली तर ते फळ असुरग्रहण करतात असे म्हटले जाते.

याच प्रकारच्या श्राद्धाचा अधिकारी वामनाने बळीराजाला बनवले. तसेच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत आले त्यावेळी सीतेने सांगितले की, त्रिजटा आपली भक्ती करते. तेव्हा रामाने त्या राक्षसीला वर दिला की, ज्या श्राद्ध करणार्‍या व्यक्तीच्या घरात चांगली सामग्री, योग्य वि‍द्या व नाही, सर्व योग्य असतानाही श्राद्ध करत नसेल व जो दक्षिणा देत नाही त्यांचे फळ मी तुला देतो. याचप्रमाणे शंकराने वासुकी नागाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन वर दिला 'नागराज, ज्या माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही, योग्य दक्षिणा दिली नाही, देवाब्राह्मणांच्या साक्षीचे उच्चारलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत. श्राद्ध विधी केला नाही अशा श्राद्ध व यज्ञाचे फळ मी तुला देतो'.

ब्राह्मणाला काही दिले जात असेल तर त्यावेळी कोणाला मनाई करू नये. दान देणार्‍याला थांबवणार्‍यास गुरुहत्येचे पातक लागते. एवढेच नाही तर अशा व्यक्तीकडून दिलेला पदार्थ देव, अग्नी व पतरही ग्रहण करत नाहीत. श्राद्धाचे दान अपात्र, नास्तिक, गुरुद्रोहीला देण्यापेक्षा पाण्यात सोडावे.

श्राद्धाचे पदार्थ :- कु‍त्रा, कोंबडा, डुक्कर आणि अपवित्र व्यक्तींच्या नजरेपासून वाचवावे

यावर अधिक वाचा :