शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

श्राद्धात म्हशीच्या नव्हे तर गायीच्या दुधाने बनवा खीर

श्राद्ध पक्षात खीर पुरी, वडे या खाद्य पदार्थांचे नैवेद्य दाखवून पूर्वजांना प्रसन्न केलं जातं. हे खाद्य पदार्थ तयार करताना शुद्धतेकडे दुर्लक्ष करून चालत नाही. काही पदार्थ या दरम्यान वर्ज्य असतात. हे पदार्थ वापरल्यास पुण्य मिळत नाही. म्हणून येथे योग्य आणि अयोग्य पदार्थ सांगण्यात येत आहे:

म्हशीचे दूध वापरणे टाळावे. खीर बनवताना गायीचे दूध वापरा. तसेच म्हशीच्या दुधाने तयार केलेले तूप वापरायला हरकत नाही.

 
श्राद्धाच्या जेवण्यात तीळ, तांदूळ, बार्ली व फळं वापरले पाहिजे.

शुद्धता म्हणून साधारण मिठाऐवजी काळं मीठ वापरायला हवं.
खाद्य पदार्थांमध्ये कांदा आणि लसूण वापरू नये. मसुराची डाळ, राजमा, चणे हे पदार्थ टाळावे.