शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

महादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल

महादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे प्रस्तुत केले जातं आहे. श्रावण मास, श्रावण सोमवार, प्रदोष, शिवरात्री किंवा दर सोमवारी या नावांचे स्मरण केल्याने महादेवाची कृपा सहज प्राप्त होते.
 
श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्याचा याहून सोपा आणि अचूक उपाय कोणताच नाही.
 
महादेवाचे 108 नावे अर्थासकट
 
1. शिव- कल्याण स्वरूप
2. महेश्वर- मायेचे अधीश्वर
3. शम्भू- आनंद स्वरूप
4. पिनाकी- पिनाक धनुष धारण करणारे
5. शशिशेखर- कपाळावर चंद्र धारण करणारे
6. वामदेव- अत्यंत सुंदर स्वरूप असणारे
7. विरूपाक्ष- विचित्र डोळे असणारे ( महादेवाचे तीन नेत्र आहेत)
8. कपर्दी- जटाजूट धारण करणारे
9. नीललोहित- नीळे आणि लाल रंग असणारे
10. शंकर- सर्वांचे कल्याण करणारे
11. शूलपाणी- हातात त्रिशूळ धारण करणारे
12. खटवांगी- खाटेचा एक पाया ठेवणारे
13. विष्णुवल्लभ- प्रभू विष्णूंचे अती प्रिय
14. शिपिविष्ट- सितुहामध्ये प्रवेश करणारे
15. अंबिकानाथ- देवी भगवतीचे पती
16. श्रीकण्ठ- सुंदर कण्ठ असणारे
17. भक्तवत्सल- भक्तांना खूप प्रेम करणारे
18. भव- संसार रूपात प्रकट होणारे
19. शर्व- कष्टांना नष्ट करणारे
20. त्रिलोकेश- तिन्ही लोकांचे स्वामी
21. शितिकण्ठ- पांढरा कण्ठ असणारे
22. शिवाप्रिय- पार्वतीचे प्रिय
23. उग्र- अत्यंत उग्र रूप असणारे
24. कपाली- कपाल धारण करणारे
25. कामारी- कामदेवाचे शत्रू, अंधकार मिटवणारे
26. सुरसूदन- अंधक दैत्याचा वध करणारे
27. गंगाधर- गंगा धारण करणारे
28. ललाटाक्ष- कपाळावर डोळा असणारे
29. महाकाल- काळांचे काळ
30. कृपानिधि- दया करणारे
31. भीम- भयंकर रूप असणारे
32. परशुहस्त- हातात फरसा धारण करणारे
33. मृगपाणी- हातात हरीण धारण करणारे
34. जटाधर- जटा ठेवणारे
35. कैलाशवासी- कैलाश रहिवासी
36. कवची- कवच धारण करणारे
37. कठोर- अत्यंत मजबूत देह असणारे
38. त्रिपुरांतक- त्रिपुरासुराचा वध करणारे
39. वृषांक- बैल चिह्न ध्वजांकित
40. वृषभारूढ- बैलची स्वारी करणारे
41. भस्मोद्धूलितविग्रह- सर्व शरीराला भस्म लावणारे
42. सामप्रिय- सामगानाला प्रेम करणारे
43. स्वरमयी- साती स्वरांमध्ये निवास करणारे
44. त्रयीमूर्ति- वेदरूपी विग्रह करणारे
45. अनीश्वर- स्वयं सर्वांचे स्वामी
46. सर्वज्ञ- सर्व विदित
47. परमात्मा- सर्व आत्मांमध्ये सर्वोच्च
48. सोमसूर्याग्निलोचन- चंद्र, सूर्य आणि अग्निरूपी डोळे असणारे
49. हवि- आहूति रूपी द्रव्य असणारे
50. यज्ञमय- यज्ञस्वरूप
51. सोम- उमा सह रूप असणारे
52. पंचवक्त्र- पाच मुख असणारे
53. सदाशिव- नित्य कल्याण रूप
54. विश्वेश्वर- सर्व विश्वाचे ईश्वर
55. वीरभद्र- वीर असूनही शांत स्वरूप असणारे
56. गणनाथ- गणांचे स्वामी
57. प्रजापति- प्रजेचं पालन करणारे
58. हिरण्यरेता- स्वर्ण तेज असणारे
59. दुर्धुर्ष- कोणाच्याही दबावात न येणारे
60. गिरीश- पर्वतांचे स्वामी
61. गिरिश्वर- कैलाश पर्वतावर झोपणारे
62. अनघ- पापरहित
63. भुजंगभूषण- सांपांचे दागिने घालणारे
64. भर्ग- पापांना नष्ट करणारे
65. गिरिधन्वा- मेरू पर्वताला धनुष बनवणारे
66. गिरिप्रिय- पर्वत प्रेमी
67. कृत्तिवासा- गजचर्म धारण करणारे
68. पुराराति- पुरांचे नाश करणारे
69. भगवान्- सर्वसमर्थ ऐश्वर्य संपन्न
70. प्रमथाधिप- प्रमथगणांचे अधिपती
71. मृत्युंजय- मृत्यूला जिंकणारे
72. सूक्ष्मतनु- सूक्ष्म शरीर असणारे
73. जगद्व्यापी- जगतमध्ये व्याप्त होऊन राहणारे
74. जगद्गुरू- जगत गुरू
75. व्योमकेश- आकाश रूपी केस असणारे
76. महासेनजनक- कार्तिकेयचे वडिल
77. चारुविक्रम- सुन्दर पराक्रम करणारे
78. रूद्र- भयानक
79. भूतपति- भूतप्रेत किंवा पंचभूतांचे स्वामी
80. स्थाणु- स्पंदन रहित कूटस्थ रूप असणारे
81. अहिर्बुध्न्य- कुण्डलिनी धारण करणारे
82. दिगम्बर- नग्न, आकाशरूपी वस्त्र असणारे
83. अष्टमूर्ति- आठ रूप असणारे
84. अनेकात्मा- अनेक रूप धारण करणारे
85. सात्त्विक- सत्व गुण असणारे
86. शुद्धविग्रह- शुद्धमूर्ति असणारे
87. शाश्वत- नित्य राहणारे
88. खण्डपरशु- तुटलेला फरसा धारण करणारे
89. अज- जन्म रहित
90. पाशविमोचन- बंधनातून मुक्ती दिलवणारे
91. मृड- सुखस्वरूप असणारे
92. पशुपति- पशूंचे स्वामी
93. देव- स्वयं प्रकाश रूप
94. महादेव- देवांचे देव
95. अव्यय- खर्च झाल्यावर देखील कमी न होणारे
96. हरि- विष्णुस्वरूप
97. पूषदन्तभित्- पूषाचे दात काढणारे
98. अव्यग्र- कधीही व्यथित न होणारे
99. दक्षाध्वरहर- दक्षाचे यज्ञ नष्ट करणारे
100. हर- पाप आणि ताप हरण करणारे
101. भगनेत्रभिद्- भग देवताचा डोळा फोडणारे
102. अव्यक्त- इंद्रियांसमोर प्रकट न होणारे
103. सहस्राक्ष- हजार डोळे असणारे
104. सहस्रपाद- हजार पाय असणारे
105. अपवर्गप्रद- कैवल्य मोक्ष देणारे
106. अनंत- देशकालवस्तु रूपी परिछेद रहित
107. तारक- सर्वांचे रक्षण करणारे
108. परमेश्वर- सर्वात परम ईश्वर