शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By वेबदुनिया|

कालसर्प योग आणि नागपंचमी पूजन!

जेव्हा जन्मपत्रिकेत राहू व केतूच्यामध्ये उरलेले सात ग्रह येतात, तेव्हा तो व्यक्ती पत्रिकेप्रमाणे कालसर्प दोषाने पीडित असतो असे समजण्यात येते. ज्या जातकाच्या पत्रिकेत कालसर्प योग असतो त्याचे जीवन अत्यंत कष्टदायक व दुखी असत. असे व्यक्ती मनातल्या मनात दुखत कुढत असून त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी येते. त्या शिवाय कालसर्प योगाचे इतर लक्षणही असतात ते बघूया :- 

1. आर्थिक चणचण, चिडचिड, बीन कारण तणाव, नैराश्य, चिंता, आत्महत्यांसारखे विचार मनात येणे, घरात क्लेश इत्यादी.

2. नवरा-बायकोत मतभेद, नपुंसकता, जमीन संबंधी व्यवधान, न्यायालयीन खटल्यांमुळे त्रास, बीन कारण वेळेचा दुरुपयोग होणे, पूजा-पाठामध्ये मन न लागणे.

3. एकाग्रता व आत्मविश्वासात कमी, मुलांची काळजी, विवाहास उशीर होणे, मुलांचे अपयशी होणे, अभ्यासात एकाग्रतेची कमी.

4. एकच विचार सारखे सारखे येणे, कार्यात अडथळे येणे विरोध उत्पन्न होणे, व्यापारात नुकसानाची शक्यता, कुठल्याही कार्यात चित्त न लागणे.

5. पोटाचे विकार, नशा करणे, झोप न येणे, मिर्गी रोग, डोकेदुखी, मायग्रेन, हिस्टीरिया, संशय, क्रोध, भूक न लागणे, क्षणिक उत्तेजना, हे सर्व लक्षण जर व्यक्तीत दिसत असतील तर त्याचे कारण म्हणजे कालसर्प योग व राहू-केतू आहे.

 
WD
म्हणून कालसर्प दोष असल्यास त्याची शांती करणे फारच जरूरी आहे. वाचकांसाठी कालसर्प योगापासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय दिले आहे, ज्याने ते आपले जीवन सुखमय व खुशाल करू शकतात.

1. ज्या जातकाच्या जीवनात वर दिलेले लक्षण असतील तर, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी कुठल्याही शिव मंदिरात नाग-नागीणचा जोडा अर्पण करावा. हा जोडा चांदी, पंचधातू, तांबा किंवा अष्ट धातूचा असायला पाहिजे.

2 नागपंचमीच्या दिवशी शिव मंदिरात 1 माळ शिव गायत्रीचा जप (यथाशक्ति) करायला पाहिजे व नाग-नागीणचा जोडा दान केल्यास उत्तम फळ मिळेल.

शिव गायत्री मंत्र :

'ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमाही तन्नोरुद्र: प्रचोदयात्।'

इतर दिवसात ही कालसर्प दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय करू शकता. खासकरून सोमवारी शिव मंदिरात जे जातक वर दिलेले मंत्र चंदनाची उदबत्ती व दिवा (तेल किंवा तूप) लावून जप करेल तर त्याला नक्कीच श्रेष्ठ फळ मिळेल.

इति शुभम्।