गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

एकदा देवी पार्वती महादेवासोबत सत्संग करत होत्या. तेव्हा त्यांनी विचारले की, गृहस्थ जीवन जगत असलेल्यांचे कल्याण कसे होऊ शकतं? यावर महादेवानी सांगितले की ''अश्या गृहस्थावर सर्व देव आणि ऋषी आणि महर्षी प्रसन्न राहतात ज्यांच्यात हे गुण असतील...
1. सत्य बोलणे
 
2. सर्व प्राण्यांवर दया करणे
 
3.  मन आणि भावनांवर संयम ठेवणे
 
4.  सामर्थ्यानुसार सेवा-परोपकार करणे
 
5. आई- वडील आणि वृद्ध लोकांची सेवा करणे

6. नम्रता आणि सद्गुणाने संपन्न असणे
 
7. अतिथी सेवेसाठी तत्पर असणारे
 
8. क्षमाशील असणे
 
9. धर्मपूर्वक कमावणारे
 
10.  दुसर्‍यांच्या धन- संपत्तीवर लोभ न ठेवणारे

11.  परस्त्रीला वासनाच्या दृष्टीने न पाहणारे
 
12.  दुसर्‍यांची निंदा न करणारे
 
13.  सगळ्यांप्रती मैत्री आणि दया भाव ठेवणारे
 
14.  मधुर आणि सौम्य वाणी बोलणारे
 
15. स्वेच्छाचारापासून दूर राहणारे
 
असा आदर्श व्यक्ती सुखी गृहस्थ असतो आणि होतो.
यापुढे महादेवाने सांगितले की....
 
मनुष्याला जीवनात सदैव शुभ कर्मच करायला हवे. शुभ कर्मांचे शुभ फल प्राप्त होतं आणि शुभ प्रारब्ध बनतं. मनुष्याच्या कर्मांप्रमाणे त्याचे प्रारब्ध ठरवलं जातं. 
 
प्रारब्ध अत्यंत बलवान असतं, त्याचप्रमाणे जीव भोगत असतो. प्राणी दुर्लक्षपणे झोपत असला तरी त्याचे प्रारब्ध सदैव जागृत असतं. म्हणूनच नेहमी सत्कर्म करतं राहावे.