मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By वेबदुनिया|

नागपंचमीची गाणी : घागर पवत बाई चुंबळ तरंगत

वहिल्या रानाला पाण्याचं जंजाळ

घागर पवत बाई चुंबळ तरंगत

नदींतल्या मगरमाशां दे माजी घागर

सासू माजी वंगाळ शिव्या मला देईल

नदींतल्या मगरमाशा दे माजी घागर

सासरा माजा वंगाळ मला भाजुनी खाईल

नदींतल्या मगरमाशा दे माजी घागर

नणंद माजी वंगाळ राग मला भरील

नदींतल्या मगरमाशा दे माजी घागर

दीर माजा वंगाळ चहाड्या करील

नदींतल्या मगरमाशी दे माजी घागर

पति माजा वंगाळ मला फोडुनी काडील

अग अग नदीबाई घोळ तुज्या पान्याचा

सारूनी ग अल्याड दे माजी घागर

अग अग नदीबाई तूं माजी माऊली

दे माजी चुंबळ ग सांजते सावली.