गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

भोपळ्याच्या फुलांची भाजी

WD
साहित्य : भोपळ्याची फुललेली देठासह फुले, कांदा, ओली मिरची किंवा लाल तिखट पूड, ओले खोबरे, फोडणीसाठी तेल, मीठ.

कृती : भोपळ्याची फुले बरीच नाजूक असतात. त्यामुळे धुताना सावकाश हळूवार धुवावीत, जास्त वेळ पाण्यात ठेवू नयेत. फुले बारीक चिरावी. ही भाजी तेलावर परतून करावी. त्यासाठी कढईत तेल घालून तापवावे. त्यात भरपूर कांदा घालून परतावा. आवश्यक वाटेल तितकीच ओली मिरची किंवा लाल तिखट पूड घालून कांद्यासह परतून घ्यावे. त्यावर चिरलेली भोपळ्याची फुले टाकून मऊ होईपर्यंत परतून घ्यावीत. चवीपुरते मीठ व ओले खोबरे घालून भाजी उतरवावी.