गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

श्रावणात महादेवाबरोबर करा रामाची पूजा

देवांचे देव महादेव प्रभू रामाचे इष्ट आहे व प्रभू राम हे महादेवाचे इष्ट आहे. उपास्य आणि उपासक यांच्यात इष्ट भाव असल्याचा हा संयोग फार दुर्लभ आहे. अश्या स्थितीला संत परस्पर देवोभव म्हणतात.
 
श्रावण मासात महादेवाचं प्रिय मंत्र 'ॐ नमः शिवाय' आणि 'श्रीराम जय राम जय जय राम' मंत्राचा जप करत महादेवाला जलाभिषेक केल्याने ते प्रसन्न होतात.


 
प्रभू रामाने म्हटले आहे की: 
 
'शिव द्रोही मम दास कहावा सो नर मोहि सपनेहु नहि पावा।'
 
अर्थात जो महादेवाचा द्रोह करून मला प्राप्त करू इच्छित असेल तो मला स्वप्नातदेखील प्राप्त करू शकणार नाही. म्हणूनच श्रावणात महादेवाची आराधना करून श्रीरामचरितमानस पाठ करण्याचेही महत्त्व आहे.