शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

श्रावणातील रानभाज्या : भोपळ्याच्या वेलाची भाजी

WD
भोपळ्याचे कोवळे पानासह वेल, कांदा, ओली मिरची, मुगाची किंवा तुरीची डाळ, ओले खोबरे, तेल किंवा मुठले (कोकम तेल), मीठ व चवीपुरता गूळ.

कृती : भोपळ्याचे कोवळे वेल धुवून बारीक चिरावे. कढईत थोडे तेल घालून त्यात बारीक कांदा टाकून परतावा. मग त्यात भिजवलेली डाळ टाकून थोडी शिजू द्यावी. अर्धी शिजलेली डाळ असताना त्यावर चिरलेली भाजी व चवीपुरता गूळ घालून भाजी झाकण घालून शिजवावी. शिजलेल्या भाजीत चवीपुरते मीठ व ओले खोबरे घालून भाजी परतून उतरवावी.