गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सिंहस्थ 2016
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2016 (12:34 IST)

सिंहस्थ -2016: मनकामनेश्वर मंदिर

जेव्हा महादेवाची तपस्या कामदेवाने भंग केली तेव्हा महादेवाच्या दृष्टी मात्राने कामदेव भस्म झाले होते आणि त्या वेळेस त्यांची बायको रतीने महादेवाला कामदेवाला जीवित करण्याची प्रार्थना केली तेव्हा देवाने त्यांना शिप्रेत स्नान आणि शिवलिंगाची पूजा करण्यासाठी  सांगितले तेव्हा रतीने तसेच केले ज्याने तिला कामदेव परत पतीच्या रूपात मिळाले. नंतर ज्या जागेवर कामदेव परत मिळाले होते त्या स्थानावर रतीने रोज स्नान केले आणि शिवलिंगाची पूजा केली ती जागा आज ही उज्जैनमध्ये मनकामनेश्वर मंदिराच्या नावाने ओळखले जाते.  
 
विश्वात सात सागरांचे अस्तित्व आहे  
सामान्य मनुष्यासाठी हे शक्य नाही आहे तो साती सागरांमध्ये स्नान करू शकेल, म्हणून प्राचीन काळात ऋषींनी उज्जैनमध्ये सात सागरांची स्थापना केली जे आजही उज्जैनमध्ये विद्यमान आहे    
1.रुद्र सागर 
2. विष्णू सागर
3. क्षीर सागर 
4. पुरुषोत्तम सागर 
5. गोवर्धन सागर 
6. रत्नाकर सागर 
7. पुष्कर सागर
ज्यात स्नान केल्याने विश्वाच्या साती सागरांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतात.