शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सिंहस्थ 2016
Written By

सिंहस्थामध्ये जात असाल तर या 14 गोष्टींचे लक्ष ठेवा

संसाराच्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवात जर तुम्ही जात असाल तर तुमच्यासाठी काही जरूरी टिप्स आणि सूचना आहे जे अमलात आणले तर तुम्ही सुरक्षा आणि सुविधेत राहाल आणि तीर्थ लाभ घेऊ शकाल.  
 
1. धार्मिक वस्त्रच धारण करा : तुम्हाला जर कुठल्याही विवादापासून स्वत:चे बचाव करायचे असेल तर तुम्ही फक्त धार्मिक वस्त्रच धारण करा. जसे स्त्रियांनी पिवळ्या रंगाची साडी आणि पुरुषांनी पांढरे पिवळे वस्त्र. मुलींनी संपूर्ण शरीर झाकणारे वस्त्र घालायला पाहिजे. कुंभ मेळा प्रशासनाने या बाबतीत आदेश दिले आहे. हे तुमचे आणि सर्वांच्या सुविधेसाठी आहे.  
 
2. गरजेचे सामान सोबत ठेवा : तुम्ही तुमच्यासोबत प्रवासात जरूरी सामान अवश्य ठेवा, जसे चादर, टॉवेल, उशी शिवाय पाण्याची बाटली, नेपकीन, एक जोडी स्लीपर आणि गर्मीपासून बचाव करण्यासाठी स्कार्फ, छत्री आणि औषध. त्याशिवाय शहर, तीर्थ आणि स्नानाची माहितीसाठी गरजेचे पुस्तक आपल्यासोबत ठेवा, जे तुमचे मार्गदर्शन करत राहील.  
 
3. स्नान संबंधी माहिती : सामान्य जनतेसाठी नदीत स्नान करण्याची वेळ असते. याची सूचना लगातार मेला प्रशासनाद्वारे दिली जाते. सकाळी साधूंच्या अंघोळी नंतरच आम जनता स्नान करू शकते.  
 
महिलांना स्नान करताना वस्त्र संबंधी विशेष सूचना दिल्या जातात. पुरुषांसाठी जरूरी आहे की त्यांनी स्नानाचे महत्त्व समजायला पाहिजे, कारण हा प्रसंग त्यांच्या पोहण्यासाठी नसतो. महिला आणि पुरुषांसाठी वेळ वेगळे घाट किंवा जागेचा वापर केला जातो, या गोष्टीचे लक्षात ठेवणे फारच गरजेचे आहे.
4. स्वच्छतेचे लक्ष ठेवा : नदीत अंघोळ करताना स्वच्छतेचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. साबणाचा प्रयोग करू नये आणि नदीत कपडे देखील धुऊ नये. सुरक्षा घेर्‍याच्या आताच स्नान करावे. पूजा सामग्री, हार, मूर्ती इत्यादी नदीत प्रवाहित करू नये. कचरा डस्टबिनमध्येच टाका. मेला क्षेत्रात पॉलिथिनचा वापर करू नये.  
 
5. साधूंचा सन्मान करा : नेहमी असे बघण्यात येत की नागा साधूंच्या शिविरच्या आजू बाजूस जास्त भीड असते. तेथे लोक नागा साधू आणि त्यांचे उपक्रम बघण्यासाठी जमा होतात, पण त्यामुळे नागा साधूंना असुविधा होते. साधू-संतांच्या शिविर किंवा शिविराच्या जवळपास अनावश्‍यक गर्दी करू नये.  
 
6. पवित्रतेचे पालन करा : तुम्ही धार्मिक उत्सवात पुण्य कमावायला जात आहे, तर मन, वचन आणि कर्माने पवित्र बनून राहा. कुंभ मेळा  तुमच्या मनोरंजन, हसी-मजाक, पिकनिक पार्टी किंवा फिरण्यासाठी नाही आहे. या गोष्टींचे विशेषकरून लक्ष ठेवा. कुठेही अपशब्दांचा प्रयोग करू नका.
7. खान-पान संबंधी सल्ला : नेहमी असे बघण्यात येत की लोक, बस स्टँड, रेलवे स्टेशन, रस्त्या किनारे इत्यादी जागांवर आपल्या सोबत आणलेले भोजन करायला लागतात. यामुळे सर्वांना असुविधा तर होतेच बलकी सर्वत्र अस्वच्छता पसरते. यासाठी प्रशासनाने पांडाल तयार केले आहे. तुम्ही एखाद्या होटल किंवा रेस्टोरेंटमध्ये जाऊन तुमच्यासोबत आणलेले भोजन करू शकता.  
 
8.सुरक्षितता सूचना : लावारिस वस्तू सापडल्यावर मेळा प्रशासन किंवा पोलिस विभागाला लगेच कळवणे तुमचे कर्तव्य आहे. कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद गतिविधीला काणाडोळा करू नका. नावेत बसताना किंवा अंघोळ करताना सुरक्षेचे पूर्ण लक्ष ठेवा. बीनं कारण मेळ्यात फिरू नका.  
 
9. यातायात नियमांचे पालन करा : यातायात नियमांचे पालन करत निर्धारित पार्किंग स्थळावरच आपले वाहन ठेवा. कुठेही वाहन उभे केल्याने सर्वांनाच असुविधा होईल आणि या प्रकारे व्यवस्थेत बिघाड येईल.
10. सभ्य नागरिक बनून राहा : प्रत्येक मोठ्या धार्मिक आयोजनात भगदाडाची आशंका, असामाजिक तत्त्वांची सक्रियता आणि गैर-धार्मिक लोकांची अनावश्यक गतिविधिंमुळे तणावाचा स्थिती उत्पन्न होते.  
 
11. विचार करून दान करा : नेहमी ढोंगी साधूंच्या चकरांमध्ये फसून व्यक्ती आपले खिसे ढिले करतो. कुठल्याही प्रकाराच्या प्रलोभनापासून स्वत:चा बचाव करा आणि पंडित, साधूंच्या चकरांमध्ये अडकू नका. दुसरीकडे भिकार्‍यांना बढ़ावा देऊ नका.  
 
12. वाईट कर्मांपासून दूर राहा : मान्यता अशी आहे की जर कुंभ तीर्थ करणारा बैल, म्हैसवर होऊन गमन करत असेल तर तो नर्कवासी बनतो. जर कोणी साधू-संतांचा अपमान केला, त्यांची खिल्ली उडवली तर तो निम्नतर योनीमध्ये जन्म घेतो.  
 
13. हे तर बिलकुल करू नये : कुठल्याही प्रकारचे मांस, मदिरा इत्यादी तामसिक भोजनाचे सेवन करून जो तीर्थ गमन करतो तो अदृश्य साधू आत्मेद्वारा शापित होतो. मासिक पाळी असलेल्या स्त्रिया किंवा अपवित्र कर्म करणार्‍या पुरुषांनी तीर्थ स्नान करू नये. असे केल्याने पाप लागतो. नदीत मूत्र विसर्जन करणे महापाप आहे.  
 
14. चांगले कर्म करा : कुंभ तीर्थ कल्पावास, स्नान आणि संतसंगासाठी असतो. तीर्थ यात्रा, पर्यटन किंवा मनोरंजनासाठी नव्हे म्हणून तीर्थात जप, तप आणि ध्यानाचे महत्त्व आहे. त्याशिवाय आपल्या पूर्वजांच्या आत्मेला शांतीसाठी हा प्रसंग महत्त्वपूर्ण आहे.   
 
मन आणि शरीराला पवित्र करण्यासाठी रोज ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून सकाळ आणि सायंकाळी संध्यावंदन करा आणि इतर वेळेस वैष्णव, शैव आणि उदासीन साधूंचे प्रवचन एका.