शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By

मैद्याचे डोसे

साहित्य: कणीक, मैदा, खोबरे, हिरवी मिरची, साखर, मोहरी, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल.
कृती : खोबरे किसून घ्यावे. कोथिंबीर चिरून घ्यावी. खोबर्‍यात थोडे पाणी घालून त्याचे दूध काढावे. कणीक, हिरवी मिरची वाटून घ्यावी. मैद्याचे पीठ, साखर, कोथिंबीर, नारळाचे दूध एकत्र करावे. पाणी घालून पीठ ढवळून एकजीव करावे. तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करावी व पिठात घालावी. त्यावर तेल सोडून डोसे भाजून घ्यावे. चटणी किंवा सांबारबरोबर गरमागरम डोसे चविष्ट लागतात. यात रव्याचा वापर करून रव्याचे डोसेही करता येतील.