गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

अन्नाई कथरिकाई

साहित्य : 16-20 लहान वांगी, लिंबा एवढी चिंच, 2 चमचे आणि अर्धा कप तेल, गोड लिंबाची 10 पानं, 1/2 चमचा मसाला, 1/2 चमचा जिरं, 1/4 चमचा मेथीदाणा, 2 चमचा धणे, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 4 सुक्या मिरच्या, 10 काळेमिरे, 1/4 चमचा हिंग, 1/4 चमचा हळद, 1/2 कप नारळाचा बुरा, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम वांग्याचे देठ काढून त्याला चारीबाजूने उभे कापावे. गरम पाण्यात चिंच भिजत घालावी आणि त्याच्या बिया काढून घ्याव्या. दोन चमचे तेल गरम करून त्यात जिरं, धणे, मेथी, चणा डाळ, उडदाची डाळ घालून फ्राय करावे नंतर त्यात तिखट, काळे मिरे, हिंग, हळद घालावी. गॅसवरून उतरवून त्यात नारळाचा बुरा घालून मिक्स करावे. मिश्रण गार झाल्यावर त्याची पेस्ट करावी. नंतर ती पेस्ट वांग्यात भरावी. कढईत अर्धा कप तेल गरम करून त्यात गोड लिंबाची पानं आणि वांगे सोडावे. उरलेल्या मसाला घालून झाकण ठेवावे. चिंचेत थोडे पाणी घालून ते भाजीवर सोडावे. मध्यम आंचेवर 15 ते 20 मिनिट शिजवावे. ही भाजी फारच रुचकर लागते. पोळी किंवा परोठे सोबत सर्व्ह करावे.