शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

सेमिया पायसम (शेवयांची खीर)

साहित्य : 1/2 कप तूप, 1/2 कप शेवया मोडलेल्या, 4 कप दूध गरम, 1/2 कप साखर, 4 वेलची पूड, 1/3 काजू तुकडे केलेले, 1/3 कप बेदाणे. 

कृती : सर्वप्रथम कढईत 1/4 कप तूप साधारण 2 मिनिटे गरम करा. शेवया घाला. ढवळा आणि बदामी होईपर्यंत परता दूध आणि साखर घाला. साखर विरघळेपर्यंत ढवळा. 5 मिनिटे शिजवा. उरलेले तूप तव्यात साधारण 2 मिनिटे गरम करा. काजू घाला आणि बदामी होईपर्यंत परता. बेदाणे घाला. काही सेकंद ढवळा आणि पायसममध्ये घाला ढवळा आणि गरम गरम वाढा.