शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (12:54 IST)

जगप्रसिद्ध टेनिसपटू राफेल, आई आणि व्हिडिओ व्हायरल

टेनिसपटू राफेल नदाल याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड  व्हायरल झाला आहे. असंख्य टेनिसप्रेमी टेनिस कोर्टवर नदालचा सामना पाहण्यासाठी जमले. यावेळी  गर्दीत माय-लेकींची ताटातूट झाली होती . टेनिसकोर्टवर शोधण्यासाठी आईची प्रचंड धडपड सुरू होती. एका बाजूस टाळ्या आणि प्रेक्षक ओरडत होते तर त्यावेळी  ही आई रडत आपल्या हरवलेल्या मुलीला कोर्टमध्ये हाका मारत होती. आवाजा मुळे  या आईचा आक्रोश कित्येकांच्या कानी गेला नाही.
 
मात्र जेव्हा राफेल सर्विस करत होता तेव्हा त्याची नजर  रडणा-या आईकडे गेले आणि त्याने तात्काळ त्याने हा  सामना थांबवला. आईला आपल्या मुलीचा शोध घेता यावा यासाठी त्याने काही काळासाठी तो थांबवला. त्यानंतर सगळेच या मुलीचा शोध घेऊ लागले. काही मिनिटांनी ही मुलगी प्रेक्षकांच्या गर्दीत रडत असताना एकाने लक्षात आणून दिले. तेव्हा आईने धावत जाऊन आपल्या मुलीला मिठीत घेतले.हे दृश्य पाहणेच उत्तम ठरेल. नक्की पहा.