शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 29 ऑगस्ट 2014 (19:00 IST)

12 ऑक्टोबरपासून 'हीरो इंडियन सुपर लीग'

आपला देश सुदृढ, सशक्त आणि तंदुरुस्त व्हावा अशी आपल इच्छा असल्याच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईत व्यक्त केली. तसेच मला फूटबॉल हा खेळ खूप आवडत असल्याचे सचिनने यावेळी सांगितले. हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाच्या अनावरणही करण्यात आले. फुटबॉल लीगच्या संघांपैकी केरळ ब्लास्टर्स संघाची मालकी सचिनकडे असून याप्रसंगी अन्य संघाचे मालकही उपस्थित होते. 12 ऑक्टोबरपासून हीरो इंडियन सुपर लीगला प्रारंभ होणार आहे.  

या फुटबॉल लीगच्या मालकांपैकी प्रमुख प्रसिद्ध व्यक्ती त्यांचे संघ असे आहेत, सचिन तेंडुलकर केरळ ब्लास्टर्स, रणबीर कपूर टीम मुंबई, अभिषेक बच्चन टीम चेन्नई, समीर मनचंदा दिल्ली डायनामोज, जॉन अब्राहम नॉर्थ ईस्ट युनायटेड, सलामन खान पुणे सिटी, वरुण धवन एफसी गोवा, सौरव गांगुली अँथलेटिको डी कोलकाता. याप्रसंगी नीता अंबानी,खासदार प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती.