Widgets Magazine

विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेसाठी बोल्टचा सहभाग नाही

किंगस्टन| Last Modified बुधवार, 15 मार्च 2017 (14:41 IST)
यंदाच्या वर्षअखेरीस नवृत्त होण्याचे वेध लागल्यामुळे विश्‍वातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट पुढील महिन्यात बहामा येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अँथलेटिक्स संघटनांच्या महासंघाच्या विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार नाही. येथे आयोजित करण्यात आलेल्या धावण्याच्या शर्यतीप्रसंगी उपस्थित असणार्‍या बोल्टने सांगितले, २२-२३ एप्रिल रोजी दोन दिवसांच्या विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत तो जमैकाच्या धावपटूंच्या संघात असणे शक्य नाही. त्याने असेही सांगितले, आगामी स्पर्धेसंबंधी माझ्या प्रशिक्षकाने मला काहीही सांगितले नाही. त्यामुळे मला शंकाच आहे की, त्या स्पर्धेत मी धावू शकणार नाही. १00 आणि २00 मीटर्स शर्यतींचा विजेता म्हणून बोल्ट विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत पात्र ठरू शकतो.


यावर अधिक वाचा :