Widgets Magazine

कोरियन ओपनमध्ये पी.व्ही. सिंधूची विजयी सलामी

Sindhu
बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने विजयी सुरूवात केली आहे. सायना नेहवालने या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर भारताकडून महिला एकेरीत सिंधूही एकमेव खेळाडू मैदानात उतरली आहे. सिंधूने पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या चेयाँग नैंग हिचा 21-13, 21-8 असा धुव्वा उडवला.
नुकत्याच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली. त्यामुळे या स्पर्धेत तिच्याकडून सर्व भारतीय चांगल्या खेळाची अपेक्षा करत आहेत. सिंधूनेही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पहिल्या सेटमध्ये सुरूवातीला आघाडी घेतली. 6-3 अशा आघाडीवर असताना चेयाँगने सिंधूला टक्कर देत आघाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.


यावर अधिक वाचा :