मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: झुरीच , शनिवार, 6 मे 2017 (10:20 IST)

मेस्सीच्या अर्जावर सुनावणी होणार

विश्‍वचषक पात्रता स्पर्धेदरम्यान पंचांच्या सहाय्यकाशी गैरवर्तन केल्यामुळे बार्सिलोना आणि अज्रेंटिनाचा खेळाडू लिओनेल मेस्सीवर जागतिक फुटबॉल संघटनांच्या महासंघाने चार सामन्यांची बंदी घातली आहे. त्या शिक्षेला मेस्सीने आव्हान दिले आहे. मेस्सीने केलेले गैरवर्तन कॅमेर्‍याने टिपले आहे. परंतु मेस्सीला या प्रकरणी त्वरित निकाल मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अज्रेंटिनाच्या ३१ ऑगस्ट रोजी होणार्‍या उरुग्वेविरुद्धच्या पात्रता सामन्यात मेस्सी खेळण्याची शक्यता अंधुकच आहे.येत्या गुरुवारी त्यावर सुनावणी होणार आहे. 
 
२३ मार्च रोजी चिलेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मेस्सीने प्रमुख पंचांच्या सहाय्यकाशी गैरवर्तन केले. परंतु सामनाधिकार्‍यांनी या घटनेबाबत फि फाला काहीच कळवले नाही, पण या घटनेची व्हिडीओ टेप्सद्वारे पाहणी केली असता मेस्सीकडून गैरवर्तन झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मेस्सीवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली. मार्च महिन्यात बोलिवियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सी खेळू शकला नाही.