testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मियामी स्पर्धेतून मरेची माघार

मियामी- पुढील आठवड्यात येथे सुरू होणार्‍या मियामी मास्टर्स पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेतून ब्रिटनचा टॉप सीडेड टेनिसपटू अँडी मरेने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. मरेच्या उजव्या कोपराला दुखापत झाली असून त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
क्ले कोर्टवरील या स्पर्धेत आपण दुखापतीमुळे सहभागी होऊ शकत नाही, असे मरेने स्पर्धा ‍आयोजकांना कळविले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत कॅनडाच्या पोस्पिसीलने मरेला पराभवाचा धक्का दिला होता.


यावर अधिक वाचा :