शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सेओल , सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (09:20 IST)

पी व्ही सिंधूने जेतेपदावर कोरलं नाव

कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने जेतेपद पटकावलं आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीपमधल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी न दवडता जपानच्या नोझेमी ओकुहारावर सिंधूने 22-20, 11-21, 21-18 अशा सेटमध्ये मात केली.
 
कोरिया सुपर सीरिज खिशात घालणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.