testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दुसरी पीवायसी-ग्रीन बेझ खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा

snukar
पुणे| Last Modified मंगळवार, 25 जुलै 2017 (11:06 IST)
पुण्याच्या निमिष कुलकर्णी, विशाल कदम यांच्यासह भरत सिसोडिया, मुकुंद भराडिया, केतन चावला व हिमांशु जैन यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित दुसऱ्या राजाभाऊ शहाडे करंडक पीवायसी-ग्रीन बेझ खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेची उपान्त्यपूर्व फेरी गाठली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखानाच्या निमिष कुलकर्णी याने आपलाच क्‍लब सहकारी आदित्य देशपांडे याचा 61-37, 62-45, 18-65, 43-51, 82-18 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम 8 खेळाडूंमध्ये आपले स्थान निश्‍चित केले.
पहिल्या दोन फ्रेम निमिषने 61-37 व 62-45 अशा जिंकून 2-0 अशी आघाडी मिळवली होती. पण आदित्यने दबावाखाली सुरेख खेळ करून 65-18, 51-43 अशा गुणांनी तिसरी आणि चौथी फ्रेम जिंकून 2-2 अशी आघाडी घेतली. अंतिम आणि निर्णायक फ्रेममध्ये निमिषने 38 गुणांच्या ब्रेकसह 82-18 गुणांनी जिंकत सामन्यात विजय मिळवला.
पीवायसीच्या विशाल कदम याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. विशालने मुंबईच्या महेश जगदाळे याचा 53-18, 46-63, 59-31, 75-35 असा सहज पराभव करून उपान्त्यपूर्व फेरी गाठली. मध्यप्रदेशच्या भरत सिसोडिया याने पीवायसीच्या योगेश लोहिया याचा 60-25, 54-05, 88-02 असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला.
मुंबईच्या मुकुंद भराडिया याने पूना क्‍लबच्या सूरज राठी याचा 56-24, 08-91, 28-57, 67-05, 72-51 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. मुंबईच्या केतन चावला याने पुण्याच्या अमोल अब्दागिरी याचा 77-40, 71-29, 67-02 असा पराभव करून आगेकूच केली. आंध्रप्रदेशच्या हिमांशु जैन याने साताऱ्याच्या कैवल्य चव्हाण याचा 89-02, 72-08, 85-13 असा पराभव करून उपान्त्यपूर्व फेरी गाठली.


यावर अधिक वाचा :