testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्रीकांत सर्वोत्कृष्ट दहा खेळाडूंमध्ये

नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 30 जून 2017 (10:57 IST)
नुकत्याच जाहीर झालेल्या बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत किदम्बी श्रीकांतने सर्वोत्तम १० खेळाडूंच्या यादीत ८ वे स्थान पटकावले. अलिकडेच इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिकंल्यामुळे त्याला या क्रमवारीत वरचे स्थान प्राप्त करता आले.
या यादीत २०१५ साली श्रीकांतने तिसरे स्थान मिळाले होते. मात्र पुढच्या काळात त्याला चांगली कामगिरी करता न आल्याने त्याची या पदावरुन घसरण झाली होली. या वर्षी श्रीकांतने इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्या खात्यात ९२०० गुणांची भर पडली. या कामगिरीच्या जोरावर त्याला जागतिक क्रमवारीत ८ वे स्थान मिळवता आले.

याव्यतिरीक्त जागतिक क्रमवारीत सायना नेहवाल १५ व्या स्थानावर विराजमान झाली आहे. यानंतर साई प्रणीत १५ व्या तर अजय जयराम १६ व्या स्थानावर पोहचला आहे.यावर अधिक वाचा :