Widgets Magazine
Widgets Magazine

नोकरीचा विषय मुख्यमंत्री तडीस नेणार का? - विजय चौधरी

devendra fadnavis
सांगली- ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने राज्य सरकारबद्दल खंत व्यक्त केली आहे. कुस्ती खेळण्यासाठी मी बाहेर जातो, त्यावेळी चाहते मला नोकरी मिळाली का? मुख्यमंत्र्यानी तुला नोकरी दिली का? हा प्रश्न विचारतातच, असे विजयने सांगितले. तो एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाला.
Widgets Magazine
माझे वडील दर मंगळवारी मं‍त्रालयात जाऊन नोकरीबाबत विचारणा करतात. त्यांना वेगवेगळी कारणे सांगितले जातात. आता मुख्यमंत्री एवढे चांगले काम करत आहेत. महापालिकाच्या निवडणुकीत त्यांना इतके चांगले यश मिळाले, पण माझा एक छोटासा नोकरीचा विषय त्यांच्याकडून तडीस लावला जात नाही, याची मला खंत वाटते, असे विजय म्हणाला. केवळ मलाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व नामंकित खेळाडूंना मुख्यंमंत्र्यांनी नोकरी दिली तर त्यांचे सरकार महाराष्ट्रातून कधीच जाणार नाही, असा भोळा आशावाद देखील विजय चौधरीने व्यक्त केला.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :