testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विम्बल्डन स्पर्धा : जेमी मरे-मार्टिना हिंगीस जोडी उपान्त्यपूर्व फेरीत

Wimbledon
Last Modified गुरूवार, 13 जुलै 2017 (10:57 IST)
इंग्लंडचा जेमी मरे आणि स्वित्झर्लंडची माजी टेनिससम्राज्ञी मार्टिना हिंगीस या अग्रमानांकित जोडीने सरळ सेटमध्ये विजयाची नोंद करताना मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. जेमी मरे व मार्टिना हिंगीस या जोडीने तिसऱ्या फेरीच्या लढतीत रोमन जेबाव्ही आणि ल्यूसी रॅडेका या झेक प्रजासत्ताकाच्या 16व्या मानांकित जोडीचे आव्हान 6-3, 6-4 असे सहज मोडून काढले.
पुरुष दुहेरीत ऑलिव्हर माराच व मेट पेव्हिक या 16व्या मानांकित जोडीने मार्सिन माटकोव्हस्की व मॅक्‍स मिर्नयी या जोडीचा 7-5, 6-2, 6-2 असा पराभव करताना उपान्त्य फेरीत धडक मारली. त्यांच्यासमोर आता हॅन्स कॅस्टिलो-आन्द्रे व्हॅसिलेव्हस्की आणि निकोला मेकटिक-फ्रॅंको स्कुगर यांच्यातील विजयी जोडीचे आव्हान आहे. दरम्यान केन स्कुपस्की व नीस स्कुपस्की या जोडीने तिसऱ्या फेरीच्या लढतीत मार्कस डॅनियल व मार्सेलो डिमोनिलर यांच्यावर 7-6, 5-7, 7-6, 6-4 अशी मात करताना पुरुष दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.


यावर अधिक वाचा :